गुरुवार, १२ मार्च, २०२०

अनुज्ञप्ती नुतनीकरणासाठी विभागनिहाय नियोजन मध्यस्थाची आवश्यकता नाही -गणेश पाटील



कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : अबकारी अनुज्ञाप्तीचे 2020-21 करीता किंवा पुढील 5 वर्षाकरिता नुतनीकरणासाठी अर्जदारांकडून तक्रारी होवू नयेत तसेच नुतनीकरण प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक होण्यासाठी विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
       अबकारी अनुज्ञाप्तीचे सुटसुटीत नुतनीकरणासाठीचे पुढीलप्रामणे नियोजन केले आहे. विभाग -निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शाहूवाडी दि. 24 मार्च 2020. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हातकणंगले- 26 मार्च 2020. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कागल- 27 मार्च 2020 आणि निरीक्षक उत्पादन शुल्क कोल्हापूर शहर.  28 मार्च 2020 स्थळ -अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालय. निरीक्षक राज्य उत्पादन  शुल्क इचलकरंजी -29 मार्च 2020, स्थळ- जुनी दूरदर्शन इमारत, इचलकरंजी.  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्‍क गडहिंग्लज- 30 मार्च 2020 स्थळ- आजरा रोड आयोध्या नगरच्या  समोर गडहिंग्लज या ठिकाणी अनुज्ञप्तीधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसोबत वरील ठिकाणी उपस्थित रहावे. नुतनीकरण याच दिवशी करण्याचे प्रस्ताविक आहे. विहित नुतनीकरण शुल्क बँकेत भरलेल्या प्रकरणात विरूपीत चलनासह विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्तावांची त्याच दिवशी परवाने नुतनीकरण करण्यात येतील.
          यासाठी मध्यस्थाची आवश्यता नाही. अनुज्ञप्तीधारक किंवा प्राधिकृत प्रतिनीधी यांनी स्वत: उपस्थित राहून नुतनीकरण काम पारदर्शक पध्दतीने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.