कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : कोरोना विषाणू प्रादूर्भाव अंतर्गत लागू करण्यात
आलेली संचारबंदी व विविध बंदी आदेशाचा उद्देश नागरिकांनी घराबाहेर न पडणे, एकत्र न
येणे व एकमेकांशी अनावश्यक संपर्क टाळणे हे आहे. त्याचप्रमाणे परदेशातून किंवा
राज्याच्या इतर भागातून संसर्ग असलेल्या व्यक्ती शहरात किंवा गावात येऊन
त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळणे हा आहे. यासाठी महानगरपालिका,
नगरपालिका व प्रत्येक गावाच्या कार्यक्षेत्रासाठी ग्राम समिती, प्रभाग समिती
स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल दिले आहेत.
या समितीमध्ये
ग्रामीण भागासाठी अध्यक्ष,सरपंच, ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबतीत त्या त्या गावातील
उप सरपंच किंवा सर्वात ज्येष्ठ गामपंचायत सदस्य किंवा स्वच्छता समिती अध्यक,
सदस्य ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक,
ग्रामपंचायतीच्या आवश्यकतेप्रमाणे पोलीस पाटील, कोतवाल, रेशन धान्य दुकानदार,
विकास डेअरी सोसायटीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपलब्ध स्वयंसेवा
संस्थेचा अध्यक्ष, तरुण मंडळ, महिला बचत गट.
शहरी
व नागरी भागासाठी अध्यक्ष प्रभागाचे नगरसेवक व सदस्य प्रभागातील तरुण मंडळ सदस्य स्वयंसेवी
संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक
महिला बचत गट, स्वच्छता निरिक्षक (मुकादम) व प्रभाग अधिकारी यांना योग्य
वाटतील असे शासकीय कर्मचारी, लोक प्रतिनिधी किंवा इतर सदस्य.
उपरोक्त
ग्राम/प्रभाग समिती प्रत्येक गावात व प्रत्येक शहरातील प्रभागामध्ये स्थापन
करण्यात यावी व या समितीव्दारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या
अत्यावश्यक व तातडीच्या कारणाव्यतिरिक्त होणाऱ्या हालचाली पूर्णपर्णे थांबविणे
आवश्यक आहे. यातून फक्त अत्यावश्यक बाबी, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा त्याचप्रमाणे इतर तातडीच्या कामाने होणाऱ्या हालचाली वगळण्यात आल्या आहेत.
या समितीमार्फत त्या-त्या प्रभागात सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक सुविधा उपलब्ध
आहेत यावर नियंत्रण ठेवण्याचे आहे. यामध्ये प्रभाग व परिसरातील, गावातील किराणा
दुकाने, रेशन धान्य दुकाने, भाजीपाला विक्रिची ठिकाणे, दूध व वैद्यकीय सेवा देणारी
दुकाने, दवाखाने इत्यादी आस्थापना सुरू असतील व याव्दारे नागरिकांना आवश्यक सोई
सुविधा मिळण्यात अडचण येणार नाही यादृष्टिने समितीने काम करण्याचे आहे. समितीच्या
कार्यक्षेत्रात नागरिक अनावश्यकरित्या वाहने, खासगी वाहने, दुचाकीवरून एका
प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणार नाहीत यावर समितीने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
महानगरपालिका, प्रभाग स्तरावर ग्राम समितीने नागरिकांची व वाहनांची अनावश्यक
हालचाली टाळण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेश मार्गावर बॅरीकेट्स उभी करावी व
नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याबाबत बंधनकारक करावे. समितीच्या माध्यमातून
समितीच्या कार्यक्षेत्रात /प्रभागातील सर्व सार्वजनिक ठिकाणी बस स्टॉप इत्यादी 1
टक्के हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करून घेण्याची त्याचप्रमाणे स्वच्छता
करण्याची कार्यवाही समितीने स्थानिक पातळीवर उभी करावी व त्याची अंमलबजावणी करावी.
समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रात परदेशातून आलेले प्रवासी त्याचप्रमाणे बाहेर
गावाहून आलेल्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत विलगीकरणात राहतील. त्यांची स्वत:ची
कुटूंबे त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक यांच्या संपर्कात ते किमान 14 दिवस येणार
नाहीत याची खबरदारी घ्यावी. अशा व्यक्तींची सविस्तर माहितीची नोंदवही प्रत्येक समितीस्तरावर
ठेवण्यात यावी. अशा व्यक्ती घरी विलगीकरणात रहात आहेत किंवा कसे याबाबत तपासणी
करण्यासाठी स्थानिक यंत्रणा उभी करावी. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांमधून परदेश
प्रवास करून आलेल्या किकंवा कसे याबाबत तपासणी
करण्यासाठी स्थानिक यंत्रणा उभी करावी. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांमधून
परदेश प्रवास करून आलेल्या किंवा बाहेर गावाहून आलेल्या परिसरातील तपासणी न
झालेल्या तसेच विलगीकरणात रहात नसलेल्या नागरिकांची तपासणी करावी व तपासणीनंतर
शहरात आल्यापासून 14 दिवस ते विलगीकरणात राहतील याबाबत स्थानिक पातळीवर नियोजन
करण्यात यावे व त्यांची दररोज तपासणी करण्याबाबत खबरदारी घ्यावी व काही लक्षण
आढळल्यास त्वरित अधिसूचित शासकीय रूग्णालय किंवा खासगी रूग्णालयाच्या ठिकाणी
त्यांची तपासणी करून घेण्याचे बंधनकारक आहे.
समितीने
करावयाची नियमित कामे संबंधित समितीने त्यांच्या स्तरावर कामे वाटून द्यावीत.
समिती गठीत करण्याचे आदेश महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका आयुक्त, प्रभाग
अधिकारी, नगर परिषद, नगरपालिका कार्यक्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात
तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी निर्गमित करावेत.
या
आदेशातील ग्रामीण /नागरी भागातील कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना
राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राम/प्रभाग समित्यांना त्याचप्रमाणे
महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, तहसिलदार गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य
अधिकारी या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेले विविध निर्बंध व आदेशांचे / समित्यांनी
दिलेल्या निर्देशांचे पालन करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या विरूध्द भारतीय
दंडविधान संहिता कलम 188 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व कारवाई करण्याचे
आदेश प्रदान करण्यात येत आहेत.
ग्राम
समितीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य
गावातील
येण्या-जाण्याचा मार्ग नियंत्रित करणे. गावात प्रवेश असणाऱ्या सर्व मार्गावर
बॅरीकेटस करून तेथे स्वयंसेवकांची नेमणूक करणे व वैद्यकीय कारणासाठी किंवा
अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर जाणे व प्रवेश करणे यासाठी सुविधा ठेवणे. गावात
बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देण्यावर नियंत्रण ठेवणे. गावातून बाहेर
जाणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे (अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त वैद्यकीय
कारणाव्यतिरिक्त हालचाल थांबविणे) गावात यापूर्वी परदेश प्रवास करून आलेल्या व
परगावावरून आलेल्या सर्व व्यक्तींची नोंदवही ठेवणे. परदेश प्रवास करून आलेल्या व
बाहेर गावाहून गावात आलेल्या सर्व व्यक्तींना गावात आलेल्या दिनांकापासून 14 दिवस
त्यांचे कुटूंब व गावातील इतर व्यक्तींपासून स्वतंत्र ठेवणे, त्यांचे विलगीकरण
करणे. 14 दिवस विलगीकरणात असलेल्या
गावातील व्यक्तींची रोजच्या रोज वैद्यकीय तपासणी होते का, त्याचप्रमाणे अशा व्यक्ती
त्यांचे कुटूंबापासून व इतरांपासून घरात किंवा घरात अशी जागा नसल्यास गावातील इतर
ठिकाणी स्वतंत्र राहतात याची रोजच्या रोज खातरजमा करणे. परदेश प्रवास करून आलेल्या
व बाहेर गावाहून आलेल्या व्यक्ती गावात
आल्यापासून 14 दिवस विलगीकरणात स्वतंत्र रहात नाहीत असे आढळून आल्यास त्यांची
सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात पाठवणी करणे. अत्यावश्यक किंवा तातडीच्या कामासाठी
गावाबाहेर जाणे व गावात येण्यास गावातील व्यक्तींना जाणे अत्यावश्यक असल्यास अशा
बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची स्वतंत्र नोंदवही ठेवणे व त्यांना पास आदा करणे. गावातील
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, रेशन धान्य दुकान, भाजीपाला, दूध इत्यादी सुरळीत व
पुरेसा असल्याबाबत रोजच्या रोज आढावा घेणे व आवश्यकता असल्यास बाहेरून पुरवठ्याचे
नियोजन करणे. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, ग्राम पातळीवर विलगीकरणात राहाणाऱ्या
व्यक्तीचे घर, आजूबाजूचा परिसर इत्यादी ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे (लायझॉल 1 टक्के
हायपोक्लोराईट).गावात आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय सुविधा व सेवा उपलब्ध राहतील,
त्याचप्रमाणे मेडिकल दुकाने अशा सुविधा सुरू असतील याबाबत लक्ष ठेवावे. गावात
कोरोना सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींना सीपीआर हॉस्पीटल, कोल्हापूर, उपजिल्हा
रूग्णालय, गडहिंग्लज किंवा आयजीएम
हॉस्पिटल, इचलकरंजी त्याचप्रमाणे वेळोवेळी अधिसूचीत केलेल्या खासगी
रूग्णालयात तपासणीसाठी पाठविणे व तावणी करून आल्यानंरत अशा व्यक्तींना घरी
विलगीकरणात ठेवण्याबाबत काळजी घेणे. गावातील सर्व नागरिकांमध्ये कोरोना विषाणू
संसर्ग व स्वच्छता बाबत जनजागृती करणे. गावात वारंवार दवंडी देवून त्याचप्रमाणे
सार्वजनिक उद्घोषणेव्दारे नागरिकाकंना माहिती देणे. गावात अनावश्यकरित्या नागरिक
घराबाहेर पडणार नाहीत, एका ठिकाणी गटाने येणार नाहीत, कोणतेही खासगी अथवा सार्वजनिक
समारंभ होणार नाहीत याबात खबरदारी घेणे. गावात अनाधिकृत प्रवासी वाहतूक होत
असल्यास ती त्वरित बंद करण्यात यावी. गावात, गावाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे
मद्य, देशी दारू, अनधिकृत दारू उत्पादने त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा,
पानपट्टी याची विक्री होत असल्यास त्यास प्रतिबंध करणे व अधीक्षक राज्य उत्पादन
शुल्क व पोलीस विभाग यांना त्वरित कळविणे. गावात स्वच्छता, निर्जंतुकीकरण,
विलगीकरणातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी
करणारे कर्मचारी इत्यादी सर्व व्यक्तींना सॅनिटायझर त्याचप्रमाणे मास्क उपलब्ध
करून देणे. गावातील अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू पुरवणारी दुकाने किंवा
आस्थापना यांच्यासमोर गर्दी होऊ नये याबाबत खबरदारी घेणे व अशा
आस्थापनांच्या/दुकानांच्या समोर प्रत्येक 2 मीटर अंतरावर नागरिकांना रांगेत उभा राहण्यासाठी
पांढऱ्या रंगाने पट्टे काढणे. विलगीकरणात असलेल्या सर्व व्यक्ती वापरत असलेल्या
त्यांच्या घरातील वस्तू त्यांच्या घरातील इतर कुटूंबीय किंवा इतर नागरिक वापरातात
काय याबाबत रोजच्या रोज खबरदारी घेणे, त्याचप्रमाणे अशा वस्तू 1 टक्के सोडियम
हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करण्यास संबंधित व्यक्तीस भाग पाडणे. गावातील सर्व
कुटूंबाचे आशा, आंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक इत्यादी कर्मचाऱ्यांच्या मदतीने
सर्वेक्षण करणे, संबंधित व्यक्तीची तपासणी करणे. परदेश प्रवास व इतर जिल्ह्यातून
परगावावरून आलेल्या सर्व व्यक्तींना होम क्वारंटाईनचे शिक्के मारणे. शिक्क्यांसाठी
इनडीलेबल इंक (शाई) उपलब्ध करून घेणे. गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता सुरळीत
ठेवणे. अलगीकरणास विरोध किंवा आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती विरूध्द गुन्हे
दाखल करणे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.