कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : कोव्हीड 19 चा अहवाल सकारात्मक
असल्याबाबत तसेच ग्रामीण रुग्णालय कागल येथील अहवाल समाज माध्यमावरुन व्हायरल करुन
फिर्यादीची खोटी अफवा पसरवल्याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द आज कागल पोलीसात गुन्हा
दाखल झाला आहे.
फिर्यादी हे मजुरी काम करीत आहे.
राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र
शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शासनाने अधिसूचना
काढून कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनाना
कोव्हीड 19 बाबत कोणत्याही प्रकारची अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक्स
अथाव समाज माध्यमावरुन प्रसारित करण्यास प्रतिबंध केला आहे. या बाबत पुण्याचे
आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक, विभागीय आयुक्त व
जिल्हाधिकारी यांच्या मार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. या बाबतची
कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीस, संस्था, संघटनांना या
कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील असे प्रसिध्द केले आहे.
असे असतानाही 21 मार्च दुपारी 2 ते 23
मार्च दुपारी 1 या दरम्यान समाज माध्यमावरुन अज्ञात व्यक्तीने कोव्हीड 19 चा अहवाल
सकारात्मक असल्याबाबत तसेच ग्रामीण रुग्णालय कागल येथील अहवाल समाज माध्यमावरुन
व्हायरल करुन फिर्यादीची खोटी अफवा पसरवून जनतेच्या मनात भीती निर्माण होईल असे
कृत्य केले या बाबत अज्ञात आरोपीविरुध्द कलम 96/2020 भा.दं.वि.स. कलम 188, 505 (1)
(ब), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 54 प्रमाणे आज कागल पोलीसात गुन्हा
दाखल झाला आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.