कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.)
: जिल्ह्यातील चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील होत असणाऱ्या ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
यांनी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता
प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोहोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र
स्वीकारावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या तहसिलदार अर्चना
कापसे यांनी कळविले आहे.
एप्रिल 2020 ते जून 2020 या
कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक
कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील चिंचणे,
पन्हाळा तालुक्यातील पोंबरे आणि शाहूवाडी तालुक्यातील कुंभवडे व मांजरे अशा एकूण 4
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकरिता नामनिर्देशन मागविण्याची प्रक्रिया 13 जून 2020
पर्यंत आहे. त्याअनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली
असून उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता
प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोहोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र
स्वीकारावे. जेणेकरून कोणताही उमेदवार निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित
राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.