बुधवार, १८ मार्च, २०२०

आरटीओचे कामकाज 31 मार्चपर्यंत बंद



       कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : कोरोना विषाणूस प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तसेच शिबीर कार्यालयातील कामकाज 31 मार्च पर्यंत बंद करण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
       या कार्यालयातील कामकाजासह शिबीर कार्यालयाचे BS IV व इतर नवीन वाहन नोंदणीचे कामकाज, अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या बाबतीत  खटला विभागाचे कामकाज, तसेच 31 मार्च पर्यंत संपणारी शिकाऊ अनुज्ञप्ती (पक्की अनुज्ञप्ती काढण्यासाठी ज्यांनी 31 मार्च पर्यंत अपाँईंटमेंट घेतली आहे अशी प्रकरणे), अनुज्ञप्ती नुतणीकरण, वाहन पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण व परवाना नुतनीकरण ही कामे चालू राहतील. पुढील निर्देश होईपर्यंत उर्वरित सर्व कामे 31 मार्च पर्यंत खंडीत करण्यात आली आहेत.
          दिनांक 19 मार्च मलकापूर, दि. 20 गडहिंग्लज, दि. 21 चंदगड, दि. 23 इचलकरंजी, दि. 24 इचलकरंजी, गगनबावडा, दि. 26 वारणानगर, दि. 27 गडहिंग्लज, गारगोटी, दि. 30 इचलकरंजी व दि. 31 इचलकरंजी येथील नियोजीत शिबीर कार्यालयांची कामेसुध्दी रद्द करण्यात आली आहेत.
          कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळा. शासनाच्या पुढील निर्देशानंतरच प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट द्या, असे आवाहन डॉ. अल्वारिस यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.