शुक्रवार, १३ मार्च, २०२०

मुलींच्या वसतीगृहात पहारेकरी पदासाठी भरती



कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या मार्फत सैनिकी मुलींचे वसतीगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पहारेकऱ्याचे  1 पद भरावयाचे आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी दिली.
हे पद कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर आहे. इच्छुकांनी आपल्या अर्जासह दिनांक 17 मार्च रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दुपारी 3 वा. मुलाखतीसाठी हजर रहावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्र.0231-2665812 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.