बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय व खासगी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी



कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : कोरोना आजारामुळे संशयित रूग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना व त्यामध्ये उपस्थित असणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वास्थ्यासाठी व सार्वजनिक हितासाठी या प्रतिबंधात्मक उपयायोजना लागू करण्यात येत आहेत. सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्कॅनर व हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवणे व ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये ताप,सर्दी व खोकला यासारखी लक्षणे असतील त्यांना योग्य उपचार घेणे  व अलगीकरण करणे बंधनकारक राहील. कार्यालयामधील अभ्यागतांचे प्रवेश कमी करणे व त्यांना परावृत्त करणे, नेहमीच्या कामकाजासाठी येणारे अभ्यागत व त्यांना देण्यात येणारे तात्पुरते प्रवेश पास तात्काळ बंद करणे. अशा अभ्यागतांबाबत ज्याला ज्या अधिकाऱ्याला भेटावयाचे आहे, त्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय तसेच पूर्ण तपासणी केल्याशिवाय परवानगी देण्यात येवू नये. तसेच कार्यालयीन प्रवेशव्दारावर कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व इमेल प्रसिध्द करावा जेणेकरून अभ्यागतांचा प्रवेश होणार नाही. शक्य त्या पातळीपर्यंत कार्यालयीन बैठका व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे घेणे. ज्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी, नागरिक सहभागी होणार आहेत, त्या बैठकांची संख्या कमीत-कमी करणे तसेच आवश्यकतेनुसार या बैठकांचे वेळापत्रक बदलणे. अनावश्यक कार्यालयीन कामकाजासाठीचे प्रवास टाळणे. अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजाबाबतचा पत्रव्यवहार ईमेलवर करणे तसेच शक्य तोवर अनावश्यक पत्रव्यवहार, संचिका, कागदपत्रे इतर कार्यालयांना पाठविले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ संभाव्य कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे व स्वीकारणे. सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना आवारामध्ये सुरू असलेल्या व्यायामशाळा, मनोरंजनात्मक केंद्रे, पाळणाघरे बंद करणे.सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना कार्यालयातील वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा, खुर्च्या, टेबल, संगणक, प्रिंटर इत्यादींची व्यवस्थित स्वच्छता करणे व वारंवार सॅनिटायझेनशन करणे. कार्यालयांतर्गत असणाऱ्या स्वच्छता गृहामध्ये हॅण्ड सॅनिटायझर, साबण व भरपूर पाणी राहील याची दक्षता घेणे. सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वत:च्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे अस्वस्थ वाटत असेल त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या पूर्वपरवानगरीने तात्काळ कार्यालय सोडावीत.तसेच हे अधिकारी व कर्मचारी यांनी MOH  व FW भारत सरकार यांच्याव्दारे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वत:ला Home Quarantine करणे. सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे की, आजारी अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत स्वत:हून कॉरंटाईन करण्याविषयी रजा अर्ज प्राप्त झाल्यास तात्काळ मंजूर करावा.सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना कार्यालयामध्ये असलेले ज्येष्ठ कर्मचारी गर्भवती महिला आणि जे अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय पार्श्वभूमी आजारी असल्याची आहे, त्यांनी जास्तीत-जास्त काळजी घेणे. त्याअनुषंगो सर्व शासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापना कार्यालयांनी अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क होणारे कामकाज देण्यात येऊ नये.
          काय करावे-
          वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखा. वारंवार हात धुवा. साबण आणि पाण्याने हात धुवा किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करा. हात स्वच्छ असले तरी हात धुवा. शिंक येत असताना किंवा खोकताना आपल नाक आणि तोंड रूमाल/टिशू पेपरन झाका. असे वापरलेले टिशू कागद बंद डब्यामध्ये, कचऱ्याच्या बंद डब्यात टाका. परस्पर संवादाच्या वेळी खासकरून फ्लूसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखा. शिंकताना किंवा खोकताना आपल्या तळहाताऐवजी कोपराचा वापर करा. आपण अस्वस्थ असल्यास शरीराचे तापमान व श्वसनांची लक्षणे नियमितपणे तपासून घ्या. डॉक्टरांना भेट देताना तोंड  आणि नाक झाकण्यासाठी मास्क, कापडाचा वापर करा.  कोणत्याही ताप/ फ्लू सदृश चिन्हे/ लक्षणांसाठी कृपया खालील हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 24x7 हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा.
          नियंत्रण कक्ष- राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक -911123978046, राज्यस्तरीय -020-26127394 व जिल्हास्तरावर-
1) जिल्हा आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय-0231-2659232 व टोल फ्री क्रमांक -1077
2) छत्रपती प्रमिलाराजे, हॉस्पीटल (CPR)- 0231-2640355
3) जिल्हा परिषद आरोग्य विभाग-0231-2661653
काय करू नये-
          हस्तांदोलन करू नका. जर आपल्याला खोकला आणि ताप येत असेल तर कोणाशीही जवळ संपर्क साधू नका. आपले डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नका, आपल्या हाताच्या तळव्यामध्ये शिंकू किंवा खोकू नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, अनावश्यकपणे प्रवास करू नका विशेषत: कोणत्याही बाधीत प्रदेशाकडे जाऊ नका, कॅन्टीनमध्ये गटात बसण्यासह मोठ्या संमेलनांमध्ये भाग घेवू नका, जीम, क्लब आणि गदीच्या ठिकाणी भेट देवू नका, अफवा पसरवू नका किंवा घाबरून जावू नका.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.