गुरुवार, ५ मार्च, २०२०

जिल्ह्यात 6 ठिकाणी लोकसंचलीत साधन केंद्र





कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांचे 6 लोकसंचलीत साधन केंद्र (सीएमआरसी) स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली.
प्रत्येक लोकसंचलित साधन केंद्रासाठी कार्यकारी मंडळासह 1 व्यवस्थापक, 1 लेखापाल व 4 सहयोगिनी असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. ही लोकसंचलीत साधन केंद्र पुढील ठिकाणी आहेत- उन्नती लोकसंचलीत साधन केंद्र, पेठवडगाव, अस्मिता लोकसंचलीत साधन केंद्र बालींगा, MKVG लोकसंचलीत साधन केंद्र हातकणंगले, आधार लोकसंचलीत साधन केंद्र इचलकरंजी, प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्र वाठार, स्फुर्ती लोकसंचलीत साधन केंद्र पोर्ले. प्रत्येक लोकसंचलीत साधन केंद्रामध्ये 500-550 बचत गट व प्रत्येक केंद्रामध्ये 7500-8000 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.