शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सरपंच, उपसरपंच निवड स्थगित



कोल्हापूर, दि.21(जिमाका)-    जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच निवडण्याकरिता 21 मार्च 2020 पासून पुढील तारखा निश्चित केलेल्या आहेत, त्या निवडीच्या सर्व तारखा राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकिशी संबंधित कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना पत्र पाठविले आहे.
दि. 21 मार्चपासून पुढील सरपंच, उपसरपंच निवडीकरिता या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या आदेशातील ग्राम पंचायती व निवडीच्या तारखा पुढीलप्रमाणे -
            तालुका शिरोळ - लाटवाडी ग्रा. पं.- उपसरपंच -31 मार्चपूर्वी. शिरदवाड- उपसरपंच - 24 मार्चपूर्वी. 
            करवीर- वाशी, नागदेववाडी आणि हसूर दुमाला- उपसरपंच - 24 मार्चपूर्वी. कोगील बु.- उपसरपंच, कोपार्डे आणि गडमुडशिंगी-सरपंच- 26 मार्चरोजी. निगवे दुमाला आणि चिंचवाड उपसरपंच-31 मार्चपूर्वी.
            पन्हाळा- बहिरेवाडी आणि दरेवाडी- उपसरपंच - 24 मार्चपूर्वी. चव्हाणवाडी- उपसरपंच- 7 एप्रिलपूर्वी.
            कागल- सुळकूड- सरपंच - 23 मार्चरोजी. व्हन्नूर- उपसरपंच- 31 मार्चपूर्वी. 
            शाहूवाडी- शिप्पूर तर्फे मलकापूर- 31 मार्चपूर्वी. 
            चंदगड- महिपालगड- उपसरपंच - 30 मार्चपूर्वी.
            भुदरगड- कडगाव - उपसरपंच - 30 मार्चपूर्वी.
   हे पत्र आज निर्गमित करण्यापूर्वी एखादी निवड घेतली असेल तर ती वगळण्यात यावी. परंतु, आजची निवडीची सभा गणपूर्ती अभावी स्थगित झाली असल्यास, पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवड स्थगित करण्यात यावी,असेही यात म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.