कोल्हापूर, दि. 9
(जि.मा.का.): महिलांनी बचत गटातून कर्ज घेवून नुसती परतफेड न करता उद्योग व्यवसाय
करण्यावर भर द्यावा. काही अडचण असेल तर माविम व ULB शी संपर्क साधावा. बचत गटातील महिलांना शहर स्वच्छता अभियानामध्ये
सहभागी व्हावे,
असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बाळकृष्ण मंदिर येथे महिला
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत
गीताने मेळाव्याची सुरूवात करण्यात
आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.
मेळाव्यास बँक ऑफ महाराष्ट्रचे उपझोनल
व्यवस्थापक वी. जी. कोमावार, आयसीआयसी
बँकेचे विभागीय प्रमुख योगेश भट, जागृती संस्थेचे अध्यक्ष संदीप
पवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे,
महानगरपालिका DAY NULM चे रोहित सोनुर्ले व राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य शारदा गवंडी आदी
उपस्थित होते.
उपायुक्त श्री. मोरे म्हणाले, माविम
व महानगरपालिका DAY NULM सोबत समन्वय हा चांगला
आहे. बचत गटातील महिलांनी कचरा व्यवस्थापनामध्ये
ओला कचरा व सुका कचरा वेगळा
करण्याकरिता App चा वापर करावा. प्लास्टिक मुळे होणाऱ्या दूष्परिणामाला रोखण्यासाठी कापडी
पिशवीचा वापर करावा. DAY NULM मधील शहरातील बचत गटातील महिलांना रोजगार संधी मिळावी व
महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता City Livlihood Centre (CLC)
तयार केली असून त्याचे उद्घाटन
लवकर करण्यात येणार असून सर्व
महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. झिंजाडे म्हणाले, महिला आर्थिक
विकास महामंडळामार्फत ( माविम ) या जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा,
परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलांसाठी बचत गटाच्या
माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत
आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये माविम अंतर्गत 108 गावात 1
महानगरपालिका व 9 नगरपरिषद मध्ये 3800 बचत
गटाच्या माध्यमातून 53 हजार 629 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात
माविममार्फत सद्यस्थितीत 95 % बचत गटांच्या
अंगावर 54.67 कोटी रुपयांचे कर्ज चालू आहे.
चालू आर्थिक
वर्षाचा विचार करता या महिन्या अखेर
1561 बचत गटांना 40.60 टी रुपया पर्यंत बँकेमार्फत पतपुरवठा
करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे
नाबार्ड मार्फत ई शक्ती कार्यक्रम सुरु असून सर्व बचत गट ऑनलाईन करण्यात आलेले
आहेत. जिल्हा
नियोजन समिती कडून माविम स्थापित आधार व उन्नती cmrc ला कापडी पिशवी चे 2 युनिट मंजूर करण्यात आलेले
आहे. या युनिटचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल असेही ते
म्हणाले. water.org
कार्यक्रम अंतर्गत स्फूर्ती व MKVG सी एम आर सी मार्फत महिलांना स्वच्छता व आरोग्या विषयी जनजागृती
केली जाते, असे ते म्हणाले.
यावेळी
बँक ऑफ महाराष्ट्राचे उपझोनल व्यवस्थपाक श्री. कोमावर, आयसीआयसी, आयसीआयसी बँकेचे रिजनल प्रमुख श्री. भट, सुकाणू
समितीच्या सदस्य श्रीमती गवंडी, जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री. पवार
यांनी मनोगत व्यक्त केले. .
सूत्रसंचालन
बलिना सी. एम.
आर. सी.
च्या व्यवस्थापक विद्या गुरव व पोर्ले सी.
एम. आर.
सी. चे व्यवस्थापक कुंभार यांनी केले.
आभार सहाय्यक सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर यांनी मानले.
मेळाव्यास
मदतनीस जितेंद्र जाधव, लोकसंचलित
साधन केंद्रच्या अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष, स्टाफ, वस्तीस्तर संघ व शहर स्तरीयच्या अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष, ग्रामसंस्था अध्यक्ष, सचिव, बचत
गटातील प्रेरक (CRP), कायदा साथी, बँक मित्रा, पशुसखी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.