कोल्हापूर, दि. 13
(जि.मा.का.): जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 70 प्रवास्यांपैकी 9 जणांची तपासणी
करण्यात आली असून उर्वरित 61 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अद्याप एकही
पॉझिटीव्ह अहवाल आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयामध्ये
परदेशातून आलेले एकूण प्रवाशी - शहरी 53 ग्रामीण 17, घरी विलगीकरण केलेले प्रवाशी
Quarantine - 70, तपासणी पूर्ण केलेले - 9, निरिक्षणाखाली ठेवलेले - 61, आयसोलेशन
हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले - 01, स्वॉब नमुने - 04 पैकी पॉझिटीव्ह - 0
निगेटिव्ह - 2 अप्राप्त - 2 आहे.
आयसोलेशन हॉस्पिटल
एकूण 4 आहेत - सी.पी.आर. हॉस्पीटल मध्ये 20 बेड, आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये 10 बेड,
इचलकरंजी आय.जी.एम. येथे 04 बेड, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथे 04 बेड, ॲस्टर
आधार येथे 10 बेड असे एकूण 48 आयसोलेशन बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आलेले आहेत.
नियंत्रण कक्ष -
जिल्हा स्तरावर - 1 व तालुका स्तरावर - 12 नियंत्रण कक्ष 24 X 7 चालू आहेत.
जिल्हा आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 0231-2659232, 1077 जिल्हा परिषद आरोग्य
विभाग येथे संपर्क नं. 0231-2661653, सी.पी.आर हॉस्पिटल 0231-2640355 येथे
संपर्क साधावा.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे उदा.
बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बॅकंस, ए.टी.एम. इत्यादी ठिकाणी वारंवार
निर्जंतुकीकरण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. हात धुण्यासाठी साबनाचा
वापर करणे यावर भर देण्यात येणार असून हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडणे या
पध्दतीचा वापर करण्यासाठी आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.