कोल्हापूर, दि. 13
(जि.मा.का.): पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू संसर्गजन्य आजराचे लागण झालेले रूग्ण
आढळून आले आहेत. त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. विलगीकरण
कक्षामध्ये रवानगी करून औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून देणे याचे नियोजन
जिल्हास्तरावर करणे आवश्यक आहे. पुणे विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार शनिवार
दिनांक 14 व रविवार दिनांक 15 मार्च रोजी महसूल, अत्यावश्यक सेवा पुरवणारी
कार्यालये व नैसर्गिक आपत्ती विषयक सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी आज दिले.
कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादूर्भाव तात्काळ नियंत्रीत
करण्याच्या अनुषंगाने विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेल्या
रूग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, त्यांचे निदान करणे व
निदानाअंती त्यांची रूग्णालयातील विलगीकरण कक्षात रवानगी करून त्यांना
औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींचे नियोजन जिल्हास्तरावर करणे
आवश्यक आहे. त्यामुळे पुणे विभागातील महसूल व अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये
तसेच नैसर्गिक आपत्ती विषयक कामकाजाशी संबंधित सर्व कार्यालये शनिवार दिनांक 14 व
रविवार दिनांक 15 रोजी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश
होईपर्यंत कोणत्याही सबबीवर मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.