कोल्हापूर,
दि. 20 (जि.मा.का.) : शासकीय तंत्र निकेतन, खेरवाडी, मुंबई यांच्यामार्फत
प्रमाणपत्र व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30
मार्च पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, शासकीय तंत्र निकेतन,
खेरवाडी, वांद्रे पूर्व, मुंबई यांच्या मार्फत प्रमाणपत्र व्यवसाय अभ्यासक्रम
राबविणाऱ्या सर्व इच्छूक व संबंधित संस्थांना नव्याने प्रमाणपत्र व्यवसाय
अभ्यासक्रम सुरू करणे, तुकडीवाढ करणे, जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करणे व
नुतनीकरण करण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात
आली होती. आता ती वाढवून 30 मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ करण्यात येत आहे. संबंधित
संस्थांनी www.vti.dvet.gov.in या
संकेतस्थळावर 15 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहनही शिक्षण व
प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.