कोल्हापूर, दि. 14 (जि.मा.का.) : परदेशातून येणारे
नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थींनी यांनी स्वत:हून 14 दिवस घरामध्ये कोरोनटाईन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
पालकमंत्री श्री. पाटील
यांनी कोरोनाबाबत तातडीची बैठक घेतली. याबैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई,
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,
प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोरोना
प्रतिबंधात्मक उपाय योजना व नियोजन याबाबत
आढावा घेतला. पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी अलगीकरण तसेच
विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत नियोजन करावे.
तेथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर तेथे देण्यात येणाऱ्या सुविधा
याबाबतही नियोजन करावे. जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडूनही
त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यामध्ये इंधन, गॅस तसेच पुरसा अन्न धान्याचा साठा
करुन ठेवावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे
रुग्णालयातील विलगीकरण कक्षाला भेट देवून पाहणी करुन सूचना दिली.
प्रशासन सज्ज नागरिकांनी सहकार्य
करावे- पालकमंत्री
कोरोनबाबत
प्रशासनामार्फत योग्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी
सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी
त्यांनी माहिती दिली.
* एकूण आलेले परदेश नागरिक -
114
* इतर ठिकाणाहून आलेले नागरिक - 04
* विलगीकरण कक्षामध्ये दाखल -
03
* तपासणी करिता पाठविण्यात आलेले नमुने -
06
* निगेटीव्ह - 03
* रिजेक्टेड - 02
* तपासणी पाठविलेले अप्राप्त अहवाल - 01
* घरी विलगीकरण करण्यात आलेले प्रवासी - 115
* त्यापैकी पाठपुरावा करुन 14 दिवस पूर्ण प्रवासी - 24
* देखरेखीखालील असणारे प्रवासी - 91
* विलगीकरणासाठी शासकीय रुग्णालयातील बेड - 38
* विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील बेड - 61
* प्रसिध्दी करिता हस्तपत्रिका वाटप - 1,75,000
* स्टिकर्स पोस्टर्स -
8600
* होर्डिग
-
50
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी
14 दिवस घरी कोरोनटाईन व्हावे-पालकमंत्री
परदेशाहून
येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी स्वत:ची माहिती प्रशासनाला
द्यावी. त्याचबरोबर स्वत:चे स्क्रीनिंग करुन घ्यावे, आपली माहिती लपवू नये,
त्यामुळे सर्व प्रथम स्वत:च्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना धोका निर्माण होवू
शकतो. त्यांनी स्वतला घरीच 14 दिवस कोरानटाईन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री
श्री. पाटील यांनी यावेळी केले.
|
स्क्रीनिंगसाठी संपर्क
* डॉ. अजय केणी, ॲस्टर
आधार हॉस्पिटल 9225068504
* डॉ. वैशाली
गायकवाड, डी.वाय.पाटील
हॉस्पिटल 9822379069
* डॉ. सतीश पुराणिक, अथायु हॉस्पिटल 9820057818
* डॉ. प्रकाश दीक्षित, डायमंड
हॉस्पिटल 9850448680
* डॉ. अशोक खटावकर, ॲपल
हॉस्पिटल 9420778535
नागरिकांनी मोठ्या मंदिरामध्ये जाणे टाळावे
- जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोरोना विषाणूचा
प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्ह्यातील मोठी मंदिरे यांच्यासह महालक्ष्मी
मंदिर, जोतिबा मंदिर त्याचबरोबर सद्गगुरू बाळूमामा मंदिर, नृसिंहवाडी अशा मोठ्या
मंदिरामध्ये दर्शनास जाणे काही काळ टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
यावेळी केले.
1) जिल्ह्यातील विविध मनोरंजनाची ठिकाणी जसे
सिनेमागृह, नाट्यगृह, वॉटरपार्क, बगिचे,
जलतरण तलाव व इतर मनोरंजनाची ठिकाणी 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवावीत.
2)
शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा,
महाविद्यालये, शैक्षणिक संस्था 31 मार्चपर्यंत बंद राहतील मात्र 10 वी व 12 वी
किंवा इतर सर्व परीक्षा वेळा पत्रकाप्रमाणे सुरु राहतील
3) सर्व
शाळेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, इतर कर्मचारी यांनी मात्र शाळेत, कार्यालयात
पूर्ण वेळ उपस्थित राहणे बंधनकारक.
4) सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देण्यासाठी समुहाने येऊ नये, त्याचबरोबर निवेदन
विनंती अर्ज इत्यादी टपालाद्वारे पाठवावेत अथवा एखाद्या व्यक्तीने येवून द्यावे
अशी प्रशासनातर्फे विनंती करण्यात
आली आहे.
5)
जिल्हयातील पर्यटन केंद्रे, गड,किल्ले,
मंदीरे, बगीचे येथे सहली काढू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.