कोल्हापूर, दि. 16
(जिमाका) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. यासाठी सर्व
ग्राहकांनी नोंदणी प्रक्रिया किमान 8 दिवस अगोदर सुरू करावी जेणेकरून
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर HSRP प्लेट बसवून दिनांक 25 मार्च रोजी वाहन
ताब्यात मिळेल, असे आवाहन
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.
स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
मार्च महिन्यातील उर्वरित सुट्ट्या रद्द करून परिवहन कार्यालय
दिनांक 31 मार्च पर्यंत सतत सुरू राहणार आहे. दिनांक 21,22,25,28 व 29 या
सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी
कालावधी लागत असल्याने व तात्पुरते नोंदणी
संगणकीय प्रणालीवर 30 दिवसांसाठी मिळत असले तरी तात्पुरत्या नोंदणीवर कितीही मुदत
दिसत असली तरी नोंदणी प्रक्रिया 25 मार्च पूर्वी पूण्र करावी, असा शिक्का
कार्यालयातर्फे मारून तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र दिले जात आहे.
सर्व बी.एस.-4 ग्राहकांना व ज्यांनी वाहन वाहन खरेदी केले आहे
व काही कारणाने नोंदणी करू शकले नाहीत त्या सर्व ग्राहकांना ही शेवटची संधी उपलब्ध
करून दिली जात आहे. याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे नवीन वाहन
नोंदणीचे कामकाज मार्च महिन्यातील उर्वरित सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू
ठेवण्यात येत आहे. सर्व वाहन वितरक व वाहन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे
आवाहनही डॉ. अल्वारिस यांनी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.