कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का) - कोरोना
विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय
अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी दवाखाने पूर्णत : किंवा
आवश्यकतेनुसार खाटांची व्यवस्था, दवाखान्यातील वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या सेवेसहित विलगीकरणासाठी अधिग्रहित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात
आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष
दौलत देसाई यांनी जारी केले आहेत.
कोरोना
विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील
तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून जिल्ह्यातील सर्व उपविभागयी
अधिकाऱ्यांनी कोरोना (कोव्हिड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार
आपआपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी दवाखाने, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी व
कर्मचाऱ्यांच्या सेवेसहित अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी व अधिग्रहीत
आस्थापना त्यांच्या खासगी व्यवस्थापनाकडे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या
नियंत्रणाखाली पुढील कार्यवाही व व्यवस्थापनासाठी सुपूर्त करण्याचे आदेश दिले
आहेत.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.