कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : विमानतळावर
येणाऱ्या परदेशातील प्रवाशांची काटेकोरपणे नोंद ठेवून तपासणी करावी. त्याचबरोबर
होम क्वॉरंटाईन बाबतही खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
केली.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात विविध विभाग प्रमुखांची
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी बैठक घेवून नेमून दिलेल्या जबाबदारीच्या
अंमलबजावणीचा आढावा घेतला. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी केम्पीपाटील, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस,
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उत्पादन शुल्क अधिक्षक
गणेश पाटील, विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत लागू करण्यात आलेल्या आदेशांची
अंमलबजावणी होते की नाही याबाबत संबंधित विभागाने खात्री करावी. परदेशातून
येणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवून होम क्वॉरंटाईनबाबत शिक्के मारावेत.
महापालिका
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, आजच वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना होम
क्वॉरंटाईनबाबत तपासणी करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी
अनावश्यक गर्दी करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात येईल.
इचलकरंजी
येथील 7 पानपट्टी धारकांवर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केल्याची
माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.
आजची तपासणी
* आयजीएम- 29
*
गडहिंग्लज- उप जिल्हा रुग्णालय- 44
पैकी 4 परदेशी
*
सीपीआर- 42
पैकी 28 परदेशी
नाके तपासणी
1) कागल- लिंगनूर, कोगनोळी, मांगूर फाटा
- 256 वाहन तपासणी. 998
प्रवासी
2)
राधानगरी- दाजीपूर 11
वाहन तपासणी 220 प्रवासी
3)
गगनबावडा-गगनबावडा 1
वाहन तपासणी 16 प्रवासी
4) हातकणंगले-पंचगंगा पूल शिवाजीनगर,
किणी टोल नाका 293
वाहन तपासणी 1357 प्रवासी
5) शिरोळ-शिवनाकवाडी,पाचमैल फाटा, उदगाव 297 वाहन तपासणी 1029 प्रवासी
6) शाहूवाडी-आंबा, अणुस्कुरा 49 वाहन तपासणी 255 प्रवासी
7)
आजरा-बहिरेवाडी 10
वाहन तपासणी 42 प्रवासी
8)
गडहिंग्लज-हिटणीनाका, हलकर्णी,
हेब्बाळ-जलद्याळ 99 वाहन तपासणी 500 प्रवासी
9)
चंदगड-शिनोळी, दड्डी, कोवाड 47
वाहन तपासणी 155 प्रवासी
खोट्या
संदेशाबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश-डॉ. कलशेट्टी
मनपा
आयुक्तांचा संदेश या शीर्षकाखाली, ‘नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की, आज
रात्री 10 नंतर उद्या सकाळी 5 पर्यंत तुम्ही घरा बाहेर पडू नये, कोवीड-1 Kill च्या
मृत्यूसाठी त्यांची हवेत औषधाची फवारणी होईल. आपल्या सर्व मित्रांना,
नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबियांना ही माहिती समाईक करा,’ असा खोटा संदेश
व्हॉट्सॲपवर फिरत आहे. या खोट्या संदेशाबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी आज दिले.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.