कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बॅंकेत होणारी अत्यावश्यक गर्दी टाळावी.
ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशिन
तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
बँका या अत्यावश्यक सेवा प्रकारात येत असल्याने
बँकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहेत. परंतु, शाखा कार्यालयामधील
गर्दी रोखणे हे बँक कर्मचारी तथा ग्राहकांसाठी एक आव्हान आहे. ज्या व्यक्तीचे काम
आहे त्याच व्यक्तीने बँकेमध्ये यावे. अन्य कर्मचारी तसेच इतर ग्राहक यांच्यांमध्ये
सुरक्षित अंतर ठेवावे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि बँकाकडे असलेल्या डिजिटल
बँकिंग सुविधांमुळे ग्राहक बहुतांश व्यवहार बँकांमध्ये न येताही करू शकतात.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार रोखीचे व्यवहार टाळा आणि डिजिटल बँकिंगचा जास्तीत-जास्त
उपयोग करा, असे आवाहनही श्री. देसाई यांनी सर्व ग्राहकांना केले आहे. जिल्ह्यात
एकूण 38 बँका कार्यरत असून 628 शाखा आहेत.
गर्दी नियंत्रीत करण्यासाठी
किमान ग्राहकांना बँका प्रवेश देत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी गैरसमज करून घेवू
नये. आपणही त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.