सोमवार, १६ मार्च, २०२०

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचा नांदवडेत छापा 2 लाख 31 हजार 600 रूपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त




कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 31 हजार 600 रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून संतोष रामाण्णा गावडे (वय 25, रा. चव्हाण गल्ली,नांदवडे)  याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
       जिल्हा भरारी पथकामार्फत काल आजरा चंदगड परिसरातील संशयित ठिकाणी अवैद्य मद्य विक्री ठिकाणांची तपासणी येत होती. नांदवडे येथे संतोष गावडे यांनी अवैद्यरित्या विक्री करण्यसाठी गोवा बनावटीचा मद्यसाठा मोठ्या प्रमाणात आणल्याची खात्रीशीर माहिती भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा घातला असता, नांदवडे गावचे हद्दित ताम्रपणी नदीच्या पलीकडे रामण्णा गावडे यांच्या शेतघरामध्ये पिंजाराखाली लपवून ठेवलेला विविध ब्रॅंडचा मद्यसाठा मिळाला.
          गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे गोल्डन एस ब्ल्यू व्हीस्की 180 व 750 मिलीच्या भरलेल्या बाटल्या असलेले 40 कागदी  बॉक्स मिळून आले. उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदिप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे, जय शिनगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.