शुक्रवार, १३ मार्च, २०२०

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही मुख्यालयात राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश




कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): पुणे विभागातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी नियुक्तीच्या मुख्यालयात हजर राहण्याचे व कोणत्याही परिस्थितीत सुट्टीच्या दिवशीही मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.  .
          पुणे विभागात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरुपाचा असल्याने तातडीने खबरदारीचे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. यासाठी या व्हायरसची लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांचे अलगीकरण करणे व त्यापैकी तपासणीअंती ज्या रुग्णामध्ये कोवीडी-19 ची लागण झाली आहे त्यांना तातडीने छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालय याठिकाणी स्थापन केलेल्या विशेष कक्षात ठेवून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.
0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.