कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : सध्या
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू (कोवीड-19) संसर्ग बाधित रुग्ण
आढळून येत आहेत. पुणे विभागामध्ये कोरोना विषाणूचे संसर्गजन्य आजाराचे लागण झालेले
रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामूळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर
तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर
प्राधान्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना
तातडीने राबविण्याची प्रक्रीया संपूर्ण देशांतर्गत सुरु आहे. कोल्हापूर
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीकरिता मुंबई – पुण्याचे
पक्षकारांची व स्थानिक पक्षकारांची
संख्या वाढली असल्याने कोरोना विषाणू (कोवीड-19) संसर्ग बळावण्याची शक्यता
असल्याने डी. आर. पाटील, सह जिल्हा निबंधक, यांनी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक
कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज दि.23/03/2020 रोजीपासून बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांना विनंती केली होती.
जिल्हाधिकारी श्री. देसाई कोल्हापूर यांनी
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीसाठी
होणारी नागरीकांची गर्दी विचारात घेतली आहे. सद्य परिस्थितीत कोरोना या विषाणूचा
प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना आवश्यक असलेने
तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पहाता सदर विषाणूची लागण एका संक्रमित
रुग्णाकडून अन्य व्यक्ती त्याच्या संपर्कात आलेने होते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील
शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयतील दस्त नोंदणीचे कामकाज
दि.23/03/2020 ते पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.
देसाई, यांनी दिले आहेत.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.