कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले निर्बंध व 144 कलम याला
अनुसरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कामकाज दिनांक 31 मार्च पर्यंत पूर्णत:
बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन
अल्वारिस यांनी दिली.
BS-IV वाहनांसाठी सर्वोच्च
न्यायालयाने दि. 31 मार्च दिनांक निर्धारित केला असला तरी कोरोना विषाणू
आपत्तीच्या कारणास्तव संपूर्ण काम बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी
नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. अल्वारिस यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.