कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : शासकीय तंत्र निकेतन, खेरवाडी, मुंबई
यांच्यामार्फत प्रमाणपत्र व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांना ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी 15 मार्च पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, शासकीय तंत्र
निकेतन, खेरवाडी, वांद्रे पूर्व, मुंबई यांच्या मार्फत प्रमाणपत्र व्यवसाय
अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व इच्छूक व संबंधित संस्थांना नव्याने प्रमाणपत्र
व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करणे, तुकडीवाढ करणे, जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम
सुरू करणे व नुतनीकरण करण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता मुदतवाढ करण्यात आली
आहे. संबंधित संस्थांनी www.vti.dvet.gov.in
या संकेतस्थळावर 15 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहनही शिक्षण
व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.