कोल्हापूर, दि. 9
(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गुणवंत मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक येथे सन 2021- 2022 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, विशेष मागासप्रवर्ग,
अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तानुसार इ. 11 वी साठी मोफत
प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज दि 13 डिसेंबरपर्यंत वाटप करण्यात येणार असल्याचे
गृहपाल एम.एन. जगताप यांनी कळविले आहे.
जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
शैक्षणिक प्रेरणा मिळून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनमार्फत ही योजना
राबविण्यात येते. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे मागील वर्षीचे गुणपत्रक, तहसिलदार यांचा
उत्पन्न दाखला, सक्षम जातीचा दाखला, बोनाफाईड, शिधापत्रिकचे झेरॉक्स, स्व:सह पालकांचे आधारकार्ड आणि कोविड संदर्भात पालकांचे
संमतीपत्र आदी कागदपत्रे दि 16 डिसेंबर पर्यंत
जमा करावीत. प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह
भत्ता 600 रुपये, शैक्षणिक साहित्य, गणवेश, दोन वेळचे जेवण व अल्पोहार इत्यादी प्रकाराच्या
सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत. दि 17 डिसेंबर
रोजी विद्यार्थ्याची निवड यादी प्रसिध्द होणार आहे. तरी प्रवेश गरजू विद्यार्थ्यांनी
प्रवेश अर्ज गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह दसरा चौक, येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी गृहपाल एम.एन. जगताप यांच्याशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 0231-
2547264 मो. 8308379099 असा आहे.
0 0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.