कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : 'आझादी का अमृतमहोत्सव" निमित्त जिल्ह्यातील
हरित सेनेच्या प्रत्येक शाळेत 75 रोपांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात येणार
होते. त्यानुसार आज अखेर 314 शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून काही शाळांनी खड्डे
सुध्दा काढून ठेवलेले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एम. बी. चंदनशिवे यांनी नुकतेच पन्हाळा
विद्यामंदिर येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या
हस्ते पन्हाळा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वर्षा जमदग्नी यांना रोप देऊन मोफत
रोपांचा पुरवठा करण्यात आला.
यावेळी पन्हाळा
विद्यामंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातील
वनक्षेत्रपाल तु.र. गायकवाड, वनपाल व्ही. जी. पाटील, सर्व वनरक्षक व वनमजूर तसेच
मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा, मुख्याध्यापिका व विभागीय वन
अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हयातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी होवून आपला सहभाग
सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदवावा, असे आवाहनही
सामाजिक वनीकरण विभागामार्फत यावेळी करण्यात
आले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.