कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत
आहेत. विभागामार्फत मागासवर्गीय प्रवर्गातील (अनु. जाती/ वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र./
इ.मा.व ) एक लाख विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जातीचा दाखला उपलब्ध करुन देण्याचे
उद्दिष्ट ठरवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी
सामाजिक न्याय विभाग व महसूल विभागामार्फत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले
आहे.
या मोहिमेअंतर्गत सध्या प्रवेशित असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
दि. २० ते ३१ डिसेंबर या कालावधीत जातीचे
दाखले प्राप्त होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संकुल प्रमुखांनी एकही
मागासवर्गीय विद्यार्थी जातीचा दाखला मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न
करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले
आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक/माध्यमिक विद्यालये/ कनिष्ठ
महाविद्यालये/ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे,
वि.जा.भ.ज./ इमाव / विमाप्र आश्रमशाळा, समाजकार्य महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्थांचे
प्रमुख, संबंधित तहसिलदार यांच्या मदतीने समन्वय साधून मागासवर्गीय सर्वच
प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले मिळण्यासाठी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी
यांच्याकडे दाखल करुन घेण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.