कोल्हापूर दि. 2 (जिमाका) : लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसराची सुधारणा करण्यासाठी गृह (ग्रामीण),
पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात
आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या निधीचा शासन निर्णय आज दि. 3 डिसेंबर रोजी निर्गमित
करण्यात आला आहे. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले
आहे.
या निधीतील 75 टक्के हिस्सा राज्य शासनाचा व 25 टक्के हिस्सा महानगरपालिकेचा
राहणार आहे. प्रत्येक कामाच्या रक्कम रुपये 10 लाख अथवा त्यापेक्षा जास्त किमतीस मान्यता
देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधा विकास या योजनेस
प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दि. 3 डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी
व शर्ती (महानगरपालिका स्वहिस्सा वगळून) बंधनकारक राहतील, असेही शासन निर्णयात नमुद
केले आहे.
0 000 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.