कोल्हापूर दि. 2 (जिमाका)
: जिल्ह्यातील केळी, गुळ, आजरा घनसाळ व नाचणी
इ. शेतमालाचे मार्केटिंग करताना शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर करावा, असे प्रतिपादन पणनचे
उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले.
कृषि पणन मंडळ, फॅमिली
फार्मिंग शेतकरी उत्पादक कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मारवाडी येथील मॅनेज
प्रशिक्षण केंद्रात बुधवार, दि. ०१ डिसेंबर रोजी शेतमालाच्या गुणवत्तेसाठी QR
कोडचा वापर याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन दिप प्रज्वलन व गणेश मूर्ती
व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून कृषिभूषण सुधिर चिवटे यांचे
हस्ते करण्यात आले. यावेळी गुळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जी.बी. गायकवाड, फॅमिली फार्मिंग प्रा. लि. चे चेअरमन उदय पाटील,
कृषिभूषण पी. डी. सावंत, आजरा घनसाळ चे संभाजी सावंत. इनोटेरा टेकचे रजनीश खरे,
राज दवे व अजय उजागरे आदीजण उपस्थित होते.
श्री. घुले म्हणाले, ग्राहकांचा
विश्वास संपादन करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. QR कोडमुळे
ग्राहकांना शेतमालाच्या गुणवत्तेबाबत हमी मिळणार असून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास
मदत होणार आहे. यनोटेरा कंपनीच्यावतीने श्री खरे. श्री दवे व श्री. उजागरे यांनी
मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी एखाद्या शेतमालाचे QR कोड करण्यासाठी सुरवातीस
अंदाजित रक्कम रु. १५ हजार पर्यंत खर्च एक वेळ करणे आवश्यक असून त्यानंतर प्रति
स्टिकर खर्च येतो. यामध्ये त्यांनी केळी पिकासाठी ३० पैसे प्रति किलो प्रति
स्टिकर, आजरा घनसाळ भातासाठी ६० पैसे प्रति किलो प्रति स्टिकर, गुळासाठी ३० पैसे
प्रति किलो प्रति स्टिकर खर्च अपेक्षित आहे.
QR
कोडमुळे ग्राहकांना उत्पादना संदर्भातील उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, उत्पादना
विषयी सविस्तर माहिती, भौगोलिक ठिकाण, उत्पादन काढल्याचे दिनांक, पॅकिंग केल्याचे
दिनांक इ बाबतची माहिती प्राप्त होणार आहे. QR कोडच्या वापरामुळे शेतकरी
मार्केटिंगसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटलायझेशनच्या युगामध्ये
प्रवेश करणार हे नक्की. अनुप थोरात, यांनी आभार मानले.
00 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.