कोल्हापूर दि. 3 (जिमाका) : हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर कार्यरत असणाऱ्या समितीवर सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,
कोल्हापूर येथे परिपूर्ण अर्ज 10 दिवसात सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
सफाई कामगारांसाठी जिल्हास्तरावर, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत कार्य करीत असणाऱ्या सामाजिक संस्थामधून किंवा सफाई कामगार समुदायातील प्रतीनिधीमधून चार समाजसेवकांची नियुक्ती करण्यात येणार
आहे. यात 2 महिला प्रतिनिधींचा समावेश
असणार आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2651318 यावर संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.