गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

पंचायत समिती हातकणंगले नुतन प्रशासकीय इमारतीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन

 


       कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : पंचायत समिती हातकणंगले नुतन प्रशासकीय इमारतचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे,  असे  पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. एस. ए. मोकाशी यांनी कळविले आहे.

       या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील  यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आमदार राजू आवळे, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी,  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.

0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.