कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्हा परिषदेत गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या
पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जांची सन २०२०
अखेरची संभाव्य जेष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. त्यामध्ये
उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर एकूण ५६ व त्यापुर्वीचे एकूण ७३ असे
एकूण १२९ उमेदवारांचे अर्ज सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर कडे
नियुक्ती करिता प्रलंबित आहेत. ही यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या
संकेत स्थळावर दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
या
यादीमध्ये पूर्ण अर्ज, अपूर्ण अर्ज व निकाली काढलेले अर्ज असे स्वतंत्रपणे दर्शविण्यात
आले आहेत. ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सादर केले आहेत त्यांची नावे ज्येष्ठता
यादीमध्ये समाविष्ठ केली आहेत. या यादीवर काही हरकती, दुरुस्ती असल्यास तसेच
ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत.,अशांनी या बाबतची पुर्तता दि. १४ डिसेंबर २०२१
पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहून
करावयाची आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती, दुरुस्ती यांचा विचार केला जाणार नाही,
असे जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई
यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.