कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : ‘राष्ट्रीय नागरी उपजिविका’ अभियानाच्या
माध्यमातून "शहरी बेघरासाठी निवारा" या उपांगाच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था संचलित चार बेघर निवारा
केंद्र कार्यरत आहेत. कोल्हापूर शहरातील लहान मुले, महिला, वयोवृध्द व्यक्ती,
दिव्यांग व्यक्ती, आजारी व्यक्ती, भिक्षेकरी
निराधार वंचित, ज्यांना निवा-याची आवश्यकता आहे, अशा व्यक्ती आढळून आल्यास
महिला निवारा गृहासाठी व पुरूष निवारा गृहासाठी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क
साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
महिला निवारा गृहासाठी जुने विचारे विद्यालय- व्यवस्थापक श्रीमती.
दिपाली सटाले, संपर्क क्र. ९१६८७९६६७३, व्यापारी संकुल- व्यवस्थापक श्रीमती पुष्पा
कांबळे, संपर्क क्र. ९९२२२०१७७३
तसेच पुरूष निवारा गृहासाठी -शिरोली नाका- व्यवस्थापक अभिजित
कांबळे, संपर्क क्र. ८४२१६२२१०७
उदय
सुर्यवंशी, संपर्क क्र.८०१०७९२८६४ याप्रमाणे संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी सचिन कांबळे, तालुका समन्वयक संपर्क क्र. ९९२२४९६९३० व कार्यालय
दुरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ येथे संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.