गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी तहसिलदारांकडे तक्रार दाखल करावा

 


कोल्हापूर दि. 16 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील जमीन वाटप केलेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांना वाटप केलेल्या जमीन व भूखंडाच्या जमीनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना कोणतीही व्यक्ती कशाही प्रकारे जमिन कसण्यास किंवा वहिवाटीस अडथळा करीत असल्यास अशा प्रकल्पग्रस्तांनी आपापल्या तालुक्यातील तहसिलदारांना दि. 21 डिसेंबर रोजी समक्ष लेखी अर्ज देवून तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अश्विनी सोनवणे (जिरंगे) यांनी केले आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या अर्जावर महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करण्यात येईल.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.