बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ सुरु

 


 कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) :  भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचा लाभ दिला जातो. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी https//mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ 15 डिसेंबर 2021 पासून शासनस्तरावरुन सुरु झाले आहे.

            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दि. 30 जानेवारी 2022 पर्यंत भरण्यासाठी सुचित करावे. तसेच सन 2020-21 मधील नुतनीकरणाचे अर्ज व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे शिष्यवृत्तीचे अर्ज या कार्यालयास वर्ग करण्याची अंतिम दि. 30 जानेवारी 2022 आहे. त्याअनुषंगाने आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही  याची  दक्षता घ्यावी.        

           महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची  तात्काळ  छाननी  करुन परीपुर्ण अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून कार्यालय स्तरावर वर्ग करण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय स्तरावरील अर्ज विहीत वेळेत या कार्यालयास वर्ग झाले नाहीत व त्यामुळे अर्ज ऑटो रिजेक्ट झाले व संबंधित मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन  समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी  केले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.