मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

 

 

 


कोल्हापूर दि. 21 (जिमाका): कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने हनुमान एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श विद्यालयामधील चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देवुन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर या शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगून विद्यार्थ्यांनी  अभ्यासूवृत्ती जोपासून यशस्वी व्हावे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी व्यक्त केले.

अॅड मिलिंद जोशी यांनी राज्य घटनेबाबत माहिती देताना समता, बंधुता राखून मुलभूत कर्तव्य पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षिका माणिक सपाटे यांनी सुत्रसंचालन केले तर सचिव तथा माजी मुख्याध्यापक उदय जोशी यांनी मनोगत व्यक्त करुन प्राधिकरणाचे सहकार्य लाभल्या बद्दल आभार मानले.

आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मेघा ठकार यांनी आभार मानले. यावेळी अॅड. किरण खटावकर यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.