बुधवार, १ डिसेंबर, २०२१

कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती

 


कोल्हापूर दि. 01 (जिमाका) :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छूकांनी आपले अर्ज दि. 7 ‍डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 अशासकीय पहारेकरी हे पद कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.