कोल्हापूर दि. 16 (जिमाका): तालुकास्तरीय लोकशाही दिन
दरमहा तिसऱ्या सोमवारी तहसिल मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात येतो. दि. 20 डिसेंबर रोजी
होणारा लोकशाही दिन हा सर्व तालुक्यांच्या तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करमणूक कर अधिकारी रंजना बिचकर यांनी केले
आहे.
लोकशाही दिनात अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे
असावे, तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका लोकशाही
दिनांत अर्ज करता येईल.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे राजस्व/अपील, सेवा विषयक /आस्थापना विषयक बाबी, अंतिम
उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज
असे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनापूर्वी संबंधित तहसिल कार्यालयात
आपले तक्रार अर्ज सादर करावेत.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.