कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : महाराष्ट्र राजभाषा
(सुधारणा) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व मराठी भाषा न वापरण्या संदर्भात
तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा मराठी भाषा समिती गठीत करण्यात
येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.
या समितीची रचना
अशी आहे. नाव, पदनाम, समितीतील पद- श्री. राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर अध्यक्ष,
डॉ. कादंबरी बलकवडे, - महानगरपालिका आयुक्त,
सदस्य, श्री. शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक सदस्य, श्री. संजयसिंह चव्हाण, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य,
श्री. एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (माध्य.), सदस्य, श्री. युवराज कदम, साहित्य
संस्था, सदस्य, श्री. अमेय जोशी, प्रकाशन संस्था, सदस्य, श्रीमती अपर्णा वाईकर, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सदस्य सचिव याप्रमाणे राहील.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.