बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

वन विभागाशी संबंधित प्रलंबित कामांसाठी विभागांनी 27 डिसेंबरला उपस्थित रहावे

 


 

कोल्हापुर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती, जिल्हा परीषदेचे सर्व विभाग, महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा तसेच शासनाचे इतर सर्व विभाग, यांच्याकडील विकासकामाचे प्रस्ताव किंवा अन्य प्रशासकीय कारणास्तव, वनविभागाचा अडथळा असल्याने काम प्रलंबित असेल किंवा वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यास किंवा वन विभागाशी संबंधित काही प्रशासकीय अडचण, अडथळा असल्यास, त्या विषयाशी संबंधित सर्व कागदपत्र घेवून सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

                                  00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.