कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड -19 च्या
पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर सालाबादप्रमाणे शनिवार दि. 18
डिसेंबर रोजी होणारा दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती गगनबावड्याचे
तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
उत्सवाच्या ठिकाणी फक्त मानकरी/ सेवेकरी/
निमंत्रित व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही
परिस्थितीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही, असे आवाहन गगनगिरी
ट्रस्ट, किल्ले गगनगड व तालुका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.