कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही.व्ही.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांच्या सुचनेनुसार दिनांक 8 नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये
फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील
प्रलंबित दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात
आली होती. या कालावधीमध्ये दिवाणी प्रकरणे ४३६ पैकी ४५ ,फौजदारी प्रकरणे ३१७ पैकी ४७
आणि दाखलपूर्व प्रकरणे १ हजार ५७ पैकी १९१ निकाली काढण्यात आली. एकूण १ हजार ८०९ प्रकरणांपैकी
२८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि ३ कोटी ९४ लाख ९५ हजार ८७४ रुपये इतकी रक्कम
वसुल करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.