कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय,
विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व
शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शलांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती
व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजनेसाठी राष्ट्रीय
शिष्यवृत्ती पोर्टलवर www.scolarship.gov.in अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली असून दिव्यांग
विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे
यांनी केले आहे.
दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी शलांतपूर्व शिष्यवृत्ती योजना,
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती
योजना व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजनांसाठी
विद्यार्थी नोंदणी- 31 डिसेंबर 2021 रोजी व
संस्था पडताळणी 15 जानेवारी 2022 अशी राहील.
दिव्यांग
विद्यार्थी लाभार्थी यांच्या अर्जाची संख्या वाढेल व केंद्र शासनाच्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या
शिष्यवृत्ती योजनांचा राज्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल
या अनुषंगाने तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.