कोल्हापूर, दि.
15 (जिमाका) :
बँक ऑफ इंडियाच्यावतीने स्टार स्वरोजगार
प्रशिक्षण संस्थेने महिलांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रास बचत गटातील
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० दिवसांच्या शिवणकला (टेलरींग) प्रशिक्षण
सत्राची सांगता नुकतीच झाली.
प्रशिक्षणास बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे लघु आणि मध्यम
उद्योग केंद्राचे सहायक महाप्रबंधक राजेंद्र कुलकर्णी आणि रिलेशनशिप मॅनेजर, स्टार
प्राईम सुनिल गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये करवीर तालुक्यातील ३५ महिलांनी सहभाग घेतला. या
प्रशिक्षणात पंजाबी ब्लाउज, ड्रेस, पटियाला ड्रेस, अनारकली ड्रेस, गाऊन, लहान
मुलांचा गणवेश, वनपीस आदी कपडे शिवण्याचे प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणात व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, बँकेच्या विविध कर्ज योजना
इ. विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा उपयोग करून छोटे- मोठे
व्यवसाय सुरु केले पाहिजेत. व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक कर्ज घेवून व ते नियमित
परतफेड करून बँकेत आपली पत निर्माण केली पाहिजे, असे मत सहायक महाप्रबंधक श्री.
कुलकर्णी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ३५ प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
कार्यक्रमासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)
कोल्हापूरच्या संचालिका सोनाली चतूर, आरसेटी श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी वैशाली
खटके, संचिता कुलकर्णी तांत्रिक प्रशिक्षिका आणि आरसेटीचे मदन पाटील, प्रजोत ढाले,
असिफ जमादार व विष्णू मांगोरे उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.