कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित
बेरोजगारांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री Multipurpose Artificial
Insemination. Worker in Rural India (Maitri) म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे
व प्रशिक्षित व्यक्तींची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती
करावयाची आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली
आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम हा तीन महिने कालावधीचा
असून, यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा
समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात
येईल व प्रॅक्टिकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी-1 किंवा
तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय
या ठिकाणी घेण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा, त्याचे वय 18
ते 35 वर्ष असावे, अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल.
जिल्ह्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातून 9,
अनुसूचित जाती प्रवर्गातून 2 अशा 11 उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात
येईल. क्लासरूम ट्रेनिंग क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ
येथे घेण्यात येईल व दोन महिन्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग जवळच्या पशुवैद्यकीय
संस्थेत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे
आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.