कोल्हापूर, दि.
20 (जिमाका): उप निबंधक, सहकारी संस्था
व कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्या. कोल्हापूर यांच्या संयुक्त सहभागाने जिल्हयातील 250 पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासद यांच्यासाठी बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी
सकाळी 11 वाजता तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र, श्री शाहु
सांस्कृतीक हॉल शेजारी, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्रातील 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुक
नियमामध्ये काही बदल करणे आले आहेत’
या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (प्रथम सुधारणा) नियम
2019 (*ई* वर्गातील संस्थांसाठी निवडणुक नियमांबाबत मार्गदर्शन)
नियमान्वये महाराष्ट्रातील 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुक नियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
हे बदल जिल्ह्यातील गृहनिर्माण
संस्थेच्या सर्व सभासदांना पारदर्शकपणे समजण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर
शिंदे व उप निबंधक प्रकाश जगताप मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेस संस्था पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. जगताप,
यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी उप निबंधक,
सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्या.कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.