कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक पर्यावरणात मोठ्या
प्रमाणात बदल होत असून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. समाजात पर्यावरणविषयक
जन जागृती निर्माण करणे तसेच पर्यावरणाचे महत्व नागरिकांना समजावे या दृष्टीने वन
विभाग आणि संस्कृती फाउंडेशन यांच्यावतीने ‘हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट
महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत 26
डिसेंबर असून www.Sanskrutifoundation.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे
आवाहन, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय
वन अधिकारी एम. बी. चंदनशिवे यांनी केले आहे.
लघुपट, बायोग्राफी, डॉक्युमेंटरी, अॅनिमेशन आदी माध्यमातून या
स्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये 20 स्पर्धकांची निवड करण्यात
येणार आहे. त्यातील प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे 30 हजार, 20 हजार व 10 हजार
रोख रक्कम, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.