मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हुपरी येथे शिबीराचे आयोजन

 


         कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हुपरी, ता. हातकणंगले, येथील जनतेच्या सोयीसाठी नव्याने भरविण्यात येणा-या शिबीर कार्यालयात अपॉईमेंट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी हुपरी येथील सर्व नागरिक वाहनधारकांसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

 25 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी उदया दि. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून शिबीरासाठी दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. शिबीर हुतात्मा स्मारक, महावीर नगर, हुपरी येथे भरविण्यात येणार असून या सुविधेचा हुपरी व नजिकच्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.