शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

अनुकंपा तत्वावर जिल्हास्तर सामायिक प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांनी 7 डिसेंबरपर्यंत शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे सादर करावीत

 


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : अनुकंपा तत्वावर जिल्हास्तरीय सामायिक सूचीमधून उमेदवार पदाच्या शिफारसीसाठी कोल्हापूर आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांची मागणी, शिफारस मागविली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील सामायिक प्रतिक्षा सुचीतील सर्व उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या  मागणीनुसार संबंधित उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बदलली/वाढीव असल्यास याबाबत शैक्षणिक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित करून कार्यासन क्र.1, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 7 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या उमेदवारांनी बदल/वाढीव शैक्षणिक पात्रतेबाबत मुदतीत माहिती न कळविल्यास, यामध्ये बदल नाही असे समजण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.