कोल्हापूर, दि.
01 (जिमाका) : : भारत
निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या
अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या
कालावधीत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने घोषित केले होते. तथापी या
कार्यक्रमास दि. 5 डिसेंबर 2021 अखेर
मुदतवाढ दिली असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत
राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत, असे अवर सचिव व उपमुख्य
निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) शरद दळवी यांनी कळविले आहे.
दावे व हरकती निकालात काढणे दि. 20
डिसेंबर पर्यंत तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी 2022 रोजी होणार
आहे.
00 0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.