कोल्हापूर, दि.
15 (जिमाका) : केंद्र
पुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह या सुधारीत योजनेस मान्यता देण्यात आली
आहे. महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या
महिलांसाठी वसतिगृह भाडे तत्वावरील इमारतीमध्ये सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर
इच्छुक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक महितीसाठी जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा,
कोल्हापूर, दूरध्वनी ०२३१- २६६१७८८ कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम. शिल्पा पाटील यांनी केले आहे.
केंद्र
पुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह ही सुधारीत योजना राज्यात
केंद्रःराज्यः स्वयंसेवी संस्थेच्यावतीने राबविण्याबाबत महिला व बाल विकास
विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयात योजना राबविणाऱ्या
संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वे व वसतीगृहासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी आवश्यक
कागदपत्रे व अटींबाबत तरतूद नमूद आहे.
या वसतिगृहामध्ये नोकरी करणाऱ्या महिला व
प्रशिक्षण घेणाऱ्या किमान ३० ते कमाल १०० प्रवेशितांना प्रवेश दिला जाणार आहे.
याकरिता महिला व बाल विकास महामंडळासह राज्य सरकारी एजन्सी, महिला वित्त निगम
संस्था / एजन्सी, शहरी महानगरपालिका आणि
कटक मंडळे, पंचायत राज संस्था,
स्वयंसहाय्यता बचत गट, मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठ, महिला कल्याण /
सामाजिक कल्याण / महिला शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या धर्मादाय, विश्वस्त, सहकारी
नोंदणीकृत संस्था यांना अर्ज सादर करता येणार आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.